Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भांडूप आग प्रकरणात दोषी आढळल्यास कारवाई करणार- CM उद्धव ठाकरे

मुंबईतील भांडूपमध्ये लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई, 26 मार्च:  भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली त्याचप्रमाणे अशा रीतीने राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड  रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरु आहेत त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. धक्कादायक बाब म्हणजे 10 जणांचा मृत्यू या आगीत झाला असून याठिकाणाहून 32 कोरोना रुग्ण गायब आहेत. त्यामुळे सनकराइज रुग्णालयावर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होतो आहे.

मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘कोव्हिड काळात काही रुग्णालयांना परवानगी देण्यात आली होती, त्यापैकी हे एक रुग्णालय होतं. आपली आरोग्यसुविधा आणि वाढती साथ यामुळे राज्यभर जिथे शक्य असेल तिथे काही कोव्हिड सेंटर आणि रुग्णालयांना परवानगी दिली होती. या रुग्णालयाला दिलेली परवानगी येत्या 31 तारखेला संपणार आहे. दुर्दैवाने  हॉस्पिटलच्या खालच्या मजल्यावर आग लागून ती आग पसरत वर पोहोचली. त्याठिकाणच्या कोरोना रुग्णांन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. पण जे रुग्ण व्हेंटिलेटरवर होते त्यांना हलवण्यासाठी नाही म्हटलं तरी थोडा अवधी लागला.  दुर्दैवाने त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याबाबतीत चौकशी केली जाईल. यामध्ये कुणाचा दोष असेल तर कायद्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आगीत होरपळून मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची माफी देखील मागितली. व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांचा या दुर्घटनेत अधिक मृत्यू झाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अशावेळी व्हेंटिलेटर बंद करणं किंवा त्याबाबत योग्य निर्णय घेणं कठिण असतंस असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबीयांकडे दिलगिरी व्यक्त केली असून या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदतही त्यांनी जाहीर केली आहे.

Comments are closed.