Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज सहा मृत्यूसह २९६ नवीन कोरोना बाधित तर १०२ कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 11 एप्रिल: जिल्हयात आज 296 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 102 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 12396 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10687 वर पोहचली आहे.

तसेच सद्या 1576 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 133 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज सहा नवीन मृत्यूमध्ये आरमोरी तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये ता.ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील तीन पुरुषाचा समावेश असून एकाचे वय 62 वर्ष, दुसऱ्या व्यक्तिचे वय 37 वर्ष  व तिसऱ्या व्यक्तिचे वय 54 वर्ष होते.  व चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर येथील 54 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच गडचिरोली तालुक्यातील मानसिक आजाराने ग्रस्त 6 वर्षीय बालकाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.21 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 12.71 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

                       नवीन 296 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 114, अहेरी तालुक्यातील 41, आरमोरी 19, भामरागड तालुक्यातील 12, चामोर्शी तालुक्यातील 18, धानोरा तालुक्यातील 15,  एटापल्ली तालुक्यातील 6, कोरची तालुक्यातील 28,  कुरखेडा  तालुक्यातील बाधितामध्ये 15, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 7, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 3 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 18 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 102 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 54, अहेरी 11, आरमोरी 11, भामरागड 7, चामोर्शी 6, धानोरा 4, मुलचेरा 2, कुरखेडा 2, तसेच वडसा 5 येथील जणाचा समावेश आहे.       

       काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील – जिल्हयातील शासकीय 68 व खाजगी 2 अशा मिळून 70 बुथवर  काल पहिला लसीकरणाचा डोज 2010 व दुसरा डोज 185 नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 46992 तर दुसरा डोज 11103 नागरिकांना देण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.