Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 235 कोरोनामुक्त, 2 मृत्यूसह 143 नवीन कोरोना बाधित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 25 मे : आज जिल्हयात 143 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 235 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28906 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26687 वर पोहचली. तसेच सद्या 1520 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 699 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 2 नवीन मृत्यूमध्ये 71 वर्षीय पुरुष विसापूर गडचिरोली, 68 वर्षीय पुरुष व्याहाड ता.सावली जि.चंद्रपूर याचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.32 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5.26 टक्के तर मृत्यू दर 2.42 टक्के झाला.


नवीन 143 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 39, अहेरी तालुक्यातील 25 आरमोरी 5, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील 30, धानोरा तालुक्यातील 6, एटापल्ली तालुक्यातील 9, कोरची तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 5, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 7, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 11 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 4 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 235 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 69, अहेरी 36, आरमोरी 18, भामरागड 03, चामोर्शी 42, धानोरा 10, एटापल्ली 5, मुलचेरा 7, सिरोंचा 16, कोरची 3, कुरखेडा 5 तसेच वडसा येथील 21 जणांचा समावेश आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.