Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात 726 तपासण्यांपैकी 1 कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 9 सप्टेम्बर : गडचिरोली जिल्हयात गुरुवारी 726 कोरोना तपासण्यांपैकी 1 नवीन कोरोना बाधित आढळून आला. तसेच आज 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30740 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29966 आहे. तसेच सद्या 28 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.48 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.09 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.

नवीन 01 बाधितांमध्ये मुलचेरा तालुक्यातील 01   जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या  05 रुग्णामध्ये अहेरी तालुक्यातील 01, आरमोरी तालुक्यातील 01, एटापल्ली तालुक्यातील 01, मुलचेरा तालुक्यातील 01, वडसा तालुक्यातील 01 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

गेवरा(खुर्द)परिसरातील नरभक्षक वाघास जेरबंद करा ! खा. अशोक नेते यांचे वनाधिकाऱ्यांना निर्देश

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.