Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गेवरा(खुर्द)परिसरातील नरभक्षक वाघास जेरबंद करा ! खा. अशोक नेते यांचे वनाधिकाऱ्यांना निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर दि.०९ सप्टेंबर : सावली तालुक्यातील गेवरा खुर्द, बोरमाळा परिसरात गेल्या चार महिन्यापासून नरभक्षक वाघाने हाहाकार माजवला असून अनेक शेतकऱ्यांना ठार केले आहे. नरभक्षक वाघाच्या हल्यात स्थानिक गावातील  महिला व पुरुष  जखमी झाले आहेत. या परिसरात १० ते १२ वाघांचा वावर असल्याने  वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणेही कठीण झाले आहे. याची गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करून सदर नरभक्षक वाघास जेरबंद करण्याचे निर्देश खा. अशोक नेते यांनी चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण कुमार यांना दिले.

आज दि ०९ सप्टेंबर रोजी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी सावली तालुक्यातील गेवरा खुर्द, गेवरा बुज, बोरमाळा परिसराचा दौरा केला. यावेळी सावली तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, माजी सभापती तुकाराम पाटील टिकरे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विनोद धोटे, पाथरीचे युवा नेते शरद सोनवाणे, सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी कांबळे, गेवरा चे सरपंच उषाताई आभारे, वासुदेव चनावार उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी गेवरा खुर्द येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शालीकराम माणिकराम चाफले (५३ वर्षे) यांच्या कुटुंबियांना व गेवरा बुज येथील वाघाच्या हल्ल्यात जखमी शकुंतला दिवाकर चौधरी यांना खा. अशोक नेते यांच्या हस्ते प्रत्येकी कुटुंबास पाच  हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

जखमी व ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्याच्या सूचना खा. अशोक नेते यांनी वनपरिक्षेत्राधिकारी कांबळे यांना दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

संजय येरणे जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

विजय दुर्गे यांना राज्यातुन इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्काराने केले सन्मानित. 

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

Comments are closed.