Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विजय दुर्गे यांना राज्यातुन इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्काराने केले सन्मानित. 

"मीच माझा रक्षक" या चित्रकलेचे राज्यातून निवड होऊन प्रथम स्थान केले प्राप्त ,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,०६ सप्टेंबर : रोहित हाऊस ऑफ आर्ट औरंगाबाद येथील संस्थेमार्फत औरंगाबाद येथे राज्यस्तरीय चित्रकलेचे आयोजन करुण वारसा व संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी “करूया स्मार्ट सिटी” या शिर्षकाखाली चित्रकला स्पर्धा घेण्यात आली .

या स्पर्धेसाठी राज्यभरातून 1000 पोस्टर पेंटिंग रोहित हाऊस ऑफ आर्ट संस्था औरंगाबाद यांच्याकडे पाठविण्यात आले होते आणि त्याच चित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन या स्पर्धेत अहेरी पंचायत समितीचे पदवीधर शिक्षक विजय दुर्गे यांची “मीच माझा रक्षक” या चित्रकलेचे राज्यातून निवड होऊन प्रथम बहुमान प्राप्त केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विजय दुर्गे यांनी आपल्या चित्रकलेत जगभरात थैमान घातलेल्या कोरोना या महाभयंकर आजारापासून आपल्याला कसा बचाव करता येईल. त्यासाठी उपाय योजना आणि सुरक्षितता लक्षात घेता “मीच माझा रक्षक “ यावर विषयावर उत्तम पोस्टर पेंटिंग करुण चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृती व्हावी म्हणून हा विषय निवडण्यात आला होता आणी त्याच विषयात ते राज्यातुन प्रथम प्राविण्य प्राप्त केले आहेत,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्यातून चित्रकला स्पर्धेतून “मीच माझा रक्षक” या पोस्टरची निवड झाल्याने विजय दुर्गे यांना इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार प्राप्त केल्याने संस्था अध्यक्ष रोहित गिरी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी भाजपाचे संजय केनेकर, जिल्हा अध्यक्ष ऍड निनाद, खोचे सर ,माझी मराठवाडा संयोजक, सांस्कृतिक प्रकाश प्रकोष्ठ समीर राजूरकर ,माजी नगरसेवक सरचिटणीस जितेंद्र छाजेड, सेक्रेटरी जैन इंटरनॅशनल स्कूल मालीवाडा ,नितीन लोखंडे, किसन प्रजापती आणि राज्यभरातून आलेले बक्षीस पात्र विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

विजय दुर्गे हे पदवीधर शिक्षक असून उत्तम चित्रकार आहेत. या आधीही जिल्हाभरात विविध चित्रकला स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले आहेत.  दुर्गे यांना राज्य स्तरावरील इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार प्राप्त केल्याने जीवनगौरव मासिकांचे संपादक रामदास वाघमारे व आनंद खोब्रागडे मुद्रण व डिझायनर तसेच प्राध्यापक डॉक्टर मधू खोब्रागडे प्राचार्य उदय भोईर ,राजा रविवर्मा चित्रकला महाविद्यालय औरंगाबाद, कलाशिक्षक मगर औरंगाबाद यांनी अभिनंदन केले तसेच पंचायत समिती अहेरीचे झोड़े सर , मुख्याध्यापक रालबंडीवार सर, मडावी सर ,मेडी सर केंद्रातील सर्व शिक्षक, शिक्षिका कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हे देखील वाचा,

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

 

अबब… केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटी परताव्याचे तब्बल 25 हजार 334 कोटी रुपये येणे बाकी.. !

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

 

 

Comments are closed.