Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली,5 सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कोवीड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2021’ चे वितरण करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमास राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती तर शास्त्रीभवनस्थित शिक्षण मंत्रालयातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण राज्यमंत्री सर्वश्री अनुपमा देवी, डॉ.सुभास सरकार आणि डॉ. राजकुमार रंजन सिंग उपस्थित होते.

देशाच्या विविध भागातून या कार्यक्रमात सहभागी 44 शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी विविध श्रेणींमध्ये गौरविण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्याच्या आसरअली येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक खुर्शीद शेख यांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळाच ठसा उमटविला आहे. श्री. शेख या भागातील आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.भाषेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना येत असलेली अडचण दूर करण्यासाठी श्री. शेख यांनी ‘ मी सुध्दा रिपोर्टर’ हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला.

त्यांनी शिक्षणातील नवनवीन उपक्रमांचा अवलंबन करून आपल्या शाळेत महत्त्वपूर्ण बदल घडविले आहेत. विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी शाळेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश खोसे यांनी ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण उपलब्ध करून दिले. श्री. खोसे यांनी परिसरातील १०० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात यश मिळविले.

विद्यार्थ्यांना शिक्षणाचे उत्तम साधने उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल क्लासरुम तयार केली. तांड्यावर मुलांना ऑफलाइन शिकता यावे यासाठी स्वतंत्र ५१ऑफलाइन ॲपची निर्मिती केली. व्हिडिओ निर्मिती करून विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची संधी उपलब्ध करून दिली. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याचे डिजिटल साहित्यही निर्माण केले आहे.

हे देखील वाचा,

बिबट्याच्या हल्यात ठार झालेल्या मुत्ता टेकुलवार यांच्या कुटूंबाची विजय खरवडे यांनी दिली सांत्वन भेट..

कोरची ग्रामीण रुग्णालयात सदोष विद्युत जोडणीमुळे नेहमी होते राहते खंडीत,अतिआवश्यक वेळीच सुरू केले जाते जनरेटर!

 

Loksparsh Exclusive : त्या…नरभक्षक वाघाने घेतला तीन वर्ष्यात अकरा जनांचा बळी, मानवी जीवितास धोका ठरलेल्या वाघाला जेरबंद करण्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)यांचे आदेश,

Comments are closed.