Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अन…धावत्या एसटी बसचा निघाले चाक , दैव बलवत्तर म्हणून वाचले ४० प्रवाशांचे प्राण

बस वाहक यांना माहिती विचारना केल्यास वागत होते उद्धट.. वेळीच बस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर

गडचिरोली दी,०६ सप्टेबर :- एसटी महामंडळाच्या धावत्या बसचा अचानक चाक निघुन गेल्याने पलटी होता होता वाचली आहे, ही घटना आज दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास ची असुन मोठा अपघात होता होता वाचला.दैव बलवत्तर असल्याने कोणत्याही प्रवाशांना ईजा झाली नसली तरी या घटनेवरून एसटी महामंडळाचे प्रवासी बस च्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेवरुन दिसून येत आहे.

आज सकाळी ०७ वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी आगाराची सिरोंचा -गडचिरोली बस क्रमांक. एमएच ४०एक्यू ६१९९सिरोंचा वरून निघाली .दरम्यान गडचिरोली नजीक असलेल्या गोविंदपूर नाल्याच्या समोर चालत्या बसचे मागील डाव्या बाजूचे चाक ड्रम सहित निघाले सोबतच दुसऱ्या बाजूचे चाक ही रॉड मधून निघून ढिले झाले होते. त्यामुळे बस पलटी खाता खाता वाचली.या बस मध्ये ४० च्या वर प्रवासी प्रवास करत होते.पोळ्याच्या दिवस असल्याने आज प्रवाशांची चांगली गर्दी होती मात्र दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

या घटनेवरून एसटी महामंडळाचे बस गाडांच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. आधीच गडचिरोली विभागात भंगार बस गाड्यांची भरमार आहे .त्यामुळे अश्या घटना होत आहेत..

हे देखील वाचा,

धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले- करूणा शर्मा

अपने को तो रायता फैलाना है, अपने को तो पैसे निकालने है प्रेशर बनाके… करुणा शर्माची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

अबब… केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटी परताव्याचे तब्बल 25 हजार 334 कोटी रुपये येणे बाकी.. !

Comments are closed.