Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक ! गडचिरोली जिल्ह्यात आज कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट..

गडचिरोली जिल्ह्यात 559 कोरोनामुक्त, 15 मृत्यूसह आज 167 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 10 मे : आज जिल्हयात 167 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 559 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 25612 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 21290 वर पोहचली. तसेच सद्या 3765 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 557 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 15 नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील 81 वर्षीय पुरुष, ता. धानोरा जि. गडचिरोली येथील 63 वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 35 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 75 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 43 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, ता. नागभिड जि. चंद्रपूर येथील 70 वर्षीय महिला, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि.गडचिरोली येथील 75 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 36 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 85 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.13 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.70 टक्के तर मृत्यू दर 2.17 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Gadchiroli Corona

नवीन 167 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 104, अहेरी तालुक्यातील 8, आरमोरी 5, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील 21, धानोरा तालुक्यातील 5, एटापल्ली तालुक्यातील 0, कोरची तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 4, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 8, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 4 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 6 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज कोरोनामुक्त झालेल्या 559 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 181, अहेरी 47,  आरमोरी 53, भामरागड 8, चामोर्शी 38, धानोरा 21, एटापल्ली 31, मुलचेरा 29, सिरोंचा 27, कोरची 22, कुरखेडा 28 तसेच वडसा येथील 74 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 

अहेरीतील अनाधिकृतपणे कोविड रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय सील

स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे काम करून ‘ती’ करते कुटुंबाचा उदरनिर्वाह

Comments are closed.