Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपूरात आजपासुन २१ मार्च पर्यंत कडक लॉकडाऊन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

नागपूर दि १५ मार्च : नागपूरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने संसार्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी  आज दि १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान नागपुर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. या दरम्यान पुर्णतः संचारबंदी लागू राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहे. कुणालाही बाहेर फिरता येणार नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनासह पोलीस विभाग देखील सज्ज झाले आहे. नागपुरातील सर्व बाजार पेठा बंद आहेत. नागपुर पोलिस आयुक्तालय शेत्रातील १०० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. आवश्यक काम असेल त्यांनाच सूट देण्यात आलेली आहे. बाहेर आलेल्यांची कागदोपत्री तपासणी केल्यानंतरच सूट देण्यात आलेल्या नागरिकांना सोडले जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नागपुरात अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. २५०० पोलीस अधिकार्यासह कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत . याशिवाय अतिरिक्त दोन महाराष्ट्र रिजर्व पोलीस फोर्स च्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत.

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लॉकडाऊन संदर्भात आढावा स्वता फिरून घेत आहेत या शिवाय व्हेरायटी चौक येथे लॉकडाऊन संदर्भात योग्य  निरीक्षण करून नियमांचे भंग करत असतील तर त्याच्यावर कारवाई करण्याचे सक्तीचे आदेश देण्यात आले आहे .

Comments are closed.