Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘एचएमपीव्ही’ चा गडचिरोलीत एकही रुग्ण नाही

-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके * दक्षता बाळगण्याचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ८ : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस ( एचएमपीव्ही) विषाणूपासून आजारी पडल्याची एकही नोंद गडचिरोली जिल्ह्यात नसल्याचा खुलासा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी केला आहे.

एचएमपीव्ही हा सामान्य विषाणू असून यामुळे श्वसन मार्गाच्या वरील भागात संसर्ग होऊन सर्दी खोकला व ताप येत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी त्याची भिती न बाळागता या संसर्गापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून  देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गपासून बचाव करण्यासाठी खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा तोंड आणि नाक, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे, साबण आणि पाण्याने आपले हात वारंवार धुणे. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहने व मास्क वापरणे, भरपूर पाणी प्यावे, पौष्टिक अन्न खाणे आणि वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने औषधोपचार करण्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याने केली आत्महत्या;

अहेरीतील नगराध्यक्षांसह सात नगरसेवकावर झालेल्या अपात्रतेस स्थगिती

वनविभागाने दोन वर्षांची मजुरी थकवली,असतानाही (म.ग्रा.रो.ह.यो) अंतर्गत नवीन कामांचा आग्रह !

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.