Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्रीय गुप्तचर (IB) विभागात 150 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

इंटेलिजन्स ब्युरो विभागाच्या आस्थापनेवरील असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर, ग्रेड II/ टेक (ACIO-II) या पदांच्या १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाची प्रक्रिया १६ एप्रिल २०२२ पासून सुरू होईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ७ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर आहे.

पदाचे नाव & तपशील:  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पदाचे नाव  शाखा  पद संख्या
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर, 

ग्रेड II/ टेक (ACIO-II)

कॉम्प्युटर सायन्स & IT  56
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन 94
Total 150

शैक्षणिक पात्रता

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  • ही भरती ग्रेड-2/तांत्रिक अंतर्गत ACIO च्या पदांवर केली जाणार आहे.
  • इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, संगणक अभियांत्रिकी, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये वैध GATE स्कोअर २०२०, २०२१ आणि २०२२ असणे आवश्यक आहे.
  • इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्रासह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन किंवा संगणक विज्ञान, संगणक अनुप्रयोगातील पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाते.

शुल्क

  • उमेदवारांना १०० रुपये शुल्कही भरावं लागणार आहे.
  • एससी, एसटी, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावं लागणार नाही.

अधिक माहितीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in वरून माहिती मिळवू शकता. 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 16 एप्रिल 2022] 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.