Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेंतर्गत जिल्ह्यात 171 प्रकरणे मंजूर

चंद्रपूर जिल्हा राज्यात सातवा तर विभागात दुस-या स्थानावर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी  : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब ब-हाटे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, बँकांचे जिल्हा समन्वयक, विविध विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी आणि सर्व जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) उपस्थित होते.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेमध्ये आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 171 कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहेत. यात चंद्रपूर जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर तर नागपूर विभागात दुस-या क्रमांकावर आहे. यातील सर्वाधिक 65 कर्ज प्रकरणे बँक ऑफ इंडिया मार्फत मंजूर करण्यात आल्याने जिल्हाधिका-यांनी अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे यांचा सत्कार केला. तसेच इतर बँकाकडे प्रलंबित असलेली सर्व 160 प्रकरणे येत्या 15 दिवसात मंजूर करण्याबाबत जिल्हाधिका-यांनी निर्देश दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

श्री. ब-हाटे यांनी योजनेच्या सद्यस्थितीबाबत तसेच बँकनिहाय प्रलंबित असलेल्या कर्ज प्रकरणाबाबत सादरीकरण केले.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानचा आढावा : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत जिल्ह्याला सन 2022-23 करिता 241.75 लक्ष मंजूर आहे. मंजूर वार्षिक कृती आराखड्याच्या तुलनेत माहे जानेवारी 2023 अखेर रु. 70.46 लक्ष निधी बाबनिहाय खर्च झाल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ब-हाटे यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यात फलोत्पादन पिकाचा क्षेत्र विस्तार, नियंत्रित शेती, फलोत्पादन यांत्रिकीकरण, मधुमक्षिका पालन, मनुष्यबळ विकास आणि काढणीत्तोर व्यवस्थापन आदी बाबींचा समावेश आहे. जिल्हास्तरीय कार्यकारी समितीने रु. 264.39 लक्ष रकमेच्या सुधारीत वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी प्रदान केल्याचे  ब-हाटे यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा : 

औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा ‘मैत्री’ कायदा – उद्योगमंत्री उदय सामंत

बॉल-बॅडमिंटन खेळाडु विद्यार्थीनींसोबत गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा अभाविप चा इशारा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.