Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे आज २४ तास काम बंद आंदोलन

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • मागण्या मान्य न झाल्‍यास २२ पासून बेमुदत काम बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १४ एप्रिल:  राज्‍य शासकीय वैदयकिय महाविदयालय आणि रूग्‍णालयातील वैदयकिय अधिका-यांनी आपल्‍या मागण्यांसाठी ७ एप्रिलपासून काळया फिती लावून काम सुरू केले आहे. शासनाने तातडीने मागण्या मान्य न केल्‍यास राज्‍यातील सर्व शासकीय वैदयकिय महाविदयालयांत १५ एप्रिल रोजी २४ तास काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्‍याउपरही शासन मागण्या मान्य करणार नसेल तर नाईलाजास्‍तव २२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागेल असा इशारा वैदयकिय महाविदयालय वैदयकिय अधिकारी संघटना महाराष्‍ट्रने दिला आहे. हे कामबंद आंदोलन करताना आम्‍हाला कुठल्‍याही रूग्‍णाला किंवा प्रशासनाला वेठीला धरायचे नसून आमच्या मागण्यांची सातत्‍याने होणारी हेळसांड पाहूनच हे पाउल अतिशय नैराश्यातून आम्‍हाला उचलावे लागत असल्‍याचे संघटनेचे म्‍हणणे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शासकीय वैदयकिय महाविदयालय आणि रूग्‍णालयातील वैदयकिय अधिकारी हे महत्‍वाचे पद असते. हे डॉक्‍टर्स कोरोना काळात एकही दिवसाची सुटटी न घेता किंवा क्‍वारंटाईन लीव्हही न घेता सलग २४ तास काम करत आहेत. शासकीय रूग्‍णालयातील सर्वच महत्‍वाच्या जबाबदा-या या डॉक्‍टर्सना पार पाडाव्या लागत आहेत. त्‍यातील  अनेकांना कोरोनाची लागणही झाली. मात्र उपचार घेउन असे डॉक्‍टर्स तात्‍काळ रूजूही झाले आहेत. गर्व्हमेंट मेडिकल कॉलेजमधील वैदयकिय अधिका-यांना कायमस्‍वरूपी करण्यात यावे व त्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या त्‍यांच्या मागण्या आहेत. तसेच हे पद मंजूर व कायमस्‍वरूपीच असल्‍याने या निर्णयाचा शासनावर कोणताही आर्थिक भारही पडणार नाही असे संघटनेचे म्‍हणणे आहे. ऑक्‍टोबर २०२० मध्येही संघटनेने आंदोलन पुकारले होते. तेव्हा शासनाकडून ज्‍यांची दोन वर्षे सेवा झाली आहे त्‍यांना कायमस्‍वरूपी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्‍याबाबत पुढे कोणताही निर्णय झालेला नाही.

या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉक्‍टरांनी ७ एप्रिलपासून काळया फिती लावून काम सुरू केले आहे. १५ एप्रिल रोजी चोवीस तासांसाठी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. याउपरही मागण्या मान्य न झाल्‍यास २२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. आज  मुंबईतील जे. जे. रूग्‍णालय येथे संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राज्‍यभरातील शासकीय रूग्‍णालयातही हे आंदोलन करण्यात येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.