२५ कोटी रुपयाचा गारमेंट मेकिंग प्रशिक्षण आणि पाणी पुरवठा योजनेचा आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शुभारंभ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपुर, दि. २२ जानेवारी: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ब्रह्मपुरी शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडला.
जलशुद्धिकरण केंद्र नगर परिषद ब्रह्मपुरी, एन.डी. गारमेंटस तर्फे एडवहांस गारमेंट मेकिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्धघाटन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
सदर प्रशिक्षण एक वर्षाचा राहणार असून महिलांना प्रशिक्षण दरम्यान दरमाह एक हजार रुपये मानधन आणी एक वेळचा जेवन सोय करण्यात येणार आहे. जिल्हयातील महिलांनी स्वताचा उद्योग सुरु करावा असा आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Comments are closed.