सिरोंच्यातील मेडीगट्टाच्या पाण्यामुळे ३० ते ४० एकर पाण्याखाली
सिरोंचा, दि. १५ जानेवारी: सिरोंचा तालुक्यातील मेडीगट्टा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे ३० ते ४० एकर शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी देशोधडीला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या वर्षी प्रकल्पाचे पाणी अडवून ठेवल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मात्र प्रकल्प प्रशासनाकडून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळाली नही. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांचा शेतात पाणी शिरल्याने नुकसान होत आहे यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे
Comments are closed.