Get real time updates directly on you device, subscribe now.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 04 मे – जिल्ह्याच्या दक्षिण विभागात व अतिदुर्गम भागात वसलेल्या विविध तीन गावांमध्ये गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ तर्फे गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यातून एकूण 42 रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला.
अहेरी तालुक्यातील सांद्रा येथे एकदिवसीय व्यसन उपचार शिबिरात एकूण 10 रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. शिबिराचे नियोजन आयोजन भूषण गौरी यांनी केले. सिरोंचा तालुक्यातील वडदेल्ली येथील व्यसन उपचार शिबीरमध्ये एकूण 22 पेशंट ने नोंदणी करून उपचार घेतला आहे. या शिबिराला मुख्य सहकार्य देसू यांनी केले असून नियोजन मुक्तिपथ चमू यांनी केले. एटापल्ली तालुक्यातील झुरी येथे आयोजित शिबिरात 10 रुग्णानी उपचार घेतला आहे. रुग्णांची नोंदणी मुक्तिपथ गांव संघटन सदस्य मनोज हिचामी यांनी केली. शिबिराचे नियोजन व व्यवस्थापन किशोर मलेवार तालुका संघटक यानी केले. यशस्वी करण्याकरिता मंगेश हिचामी गांव पाटिल, गोसू हिचामी ग्रा प सदस्य, अंजली मटामी ग्रा प सदस्य, कविता हिचामी आशा वर्कर यांनी सहकार्य केले.
व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा
अशाप्रकारे तिन्ही गावात आयोजित शिबिराच्या माध्यमातून एकूण 42 रुग्णांनी व्यसन उपचार घेत दारू सोडण्याचा निर्णय घेतला. तिन्ही गावांमधील शिबिरात रुग्णाची केस हिस्ट्री दशरथ रमकाम सयोजक यानी घेतली. तसेच रुग्णांना धोक्याचे घटक, दारूचे दुष्परिणाम पटवून देत रुग्णांचे समूपदेशन व ग्रुप शेषण पूजा येलूरकर समूपदेशक यांनी घेतले.
Comments are closed.