Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घराच्या खोदकामात सापडले मुघलकालीन नाण्यासह ४२८ ग्रॅम सोने

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा : जिल्ह्यातील नाचणगाव येथे जुन्या घराचे खोदकाम केल्यावर त्याचा मलबा शेतात टाकत असतांना  काही मजुरांना सोन्याचा खजिनाच हाती लागला आहे. तब्बल ४२८ ग्राम सोने सापडले आहे. त्यात मुघलकालीन नान्यासह बिस्कीट देखील आढळून आले. सदर घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हे सोनं ताब्यात घेतल आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वर्ध्याच्या नाचणगाव येथे जुन्या घराचं खोदकाम सुरू होत. घराचा मलबा शेतात टाकताना कचरा साफ करताना मजुरांना एक डबी मिळाली. त्यात बघितल असता सोनं आढळलं. या सोन्यात एक बिस्कीट आणि मोगलकालीन नाण, कानातील रिंग असे एकूण ९ प्रकार आहेत. ४२८ ग्रॅम वजन असलेल्या सोन्याची आजची किंमत २० लाख ५४ हजार किंमत आहे.  मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी हे सोन ताब्यात घेतलं. ही बाब पुरातत्व विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्याशी संपर्क साधत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.

 

शेतकऱ्याने सोनं घेताच, मजुरांची पोलिसांत धाव

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शेतात सोन्याचा खजिनाची डबी सापडल्याची माहिती मिळताच शेतकरी चांदोरे याने मजुरांकडून हे सोने स्वतःकडे हिसकावून घेतले. त्यानंतर  मजुरांनी पुलगाव पोलीस स्टेशन गाठून सोन मिळाल्याचा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांना माहिती प्राप्त होताच शेतकऱ्याला गाठण्यात आले आणि सोने ताब्यात घेण्यात आले.

मुघलकालीन नाणी यात सापडली असल्याने पुलगाव शहराच्या इतिहासाबाबत नवीन माहिती प्राप्त होण्याची शक्यता आहे. ही नाणी इथे कशी आली? मुघलकाळातील कोणत्या राजाच्या काळातील ही नाणी आहे? त्या मागचा इतिहास काय आहे? आदींचा अभ्यास करण्यात पुरातत्व विभागाला मदत होणार असल्याचं रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं. दरम्यान, सोन्याचं घबाड सापडल्याने पंचक्रोशीत चर्चांना एकच उधाण आलं असून सोनं पाहण्याच्या उत्सुकतेने अनेकजण नाचणगाव गाठताना दिसत आहेत.

 

हे देखील वाचा : 

घाणपाण्यामुळे वनवसाहतीतील परिवारांचे आरोग्य धोक्यात

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.