Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तालुका धानोरा येथील क्रिडांगणासाठी ५ कोटी रुपये मंजुर

खासदार अशोक भाऊ नेते यांच्या पुढाकाराने,युवा नेते सारंग साळवे यांच्या प्रयत्नाना यश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

धानोरा ४ मार्च : गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांनी धानोरा तालुका क्रीडांगणासाठी वारंवार मागणी केली होती व यासाठी धानोरा येथील भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग भाऊ साळवे, साजन भाऊ गुंडावार, संजय भाऊ कुंडू , सुभाष धाईत , सुभाष खोबरे, लंकेश म्हाशाखेत्री ,राकेश खरवडे, प्रकाश कुर्झेकर, राकेश दास , घनश्याम मडावी, गणेश भुपतवार व स्थानिक भाजप पदाधिकारी यांनी येथील क्रीडांगण करिता गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांच्या पुढाकाराने वारंवार सबंधित मंत्रालयात पाठपुरावा करीत होते व नुकताच सदर मागणी मंजूर करण्यात आली असून तालुका क्रीडा संकुलासाठी पाच कोटी रुपये 2 मार्च 2023 च्या आदेशान्वये मंजूर करण्यात आले आहे.

या निर्णयानुसार ५० लक्ष रुपयाचा निधी आधीच वितरित करण्यात आला आहे सदर निर्णयाचे समस्त धानोरा तालुक्यातील जनतेने स्वागत केले असून राज्य सरकारचे आभार व गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांचे सुद्धा जाहीर आभार मानले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धानोरा येथील क्रीडा संकुल मंजूर झाल्याने तालुका वासियांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून धानोरा वासीयांनी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवाच्या पाड्यावर

सेवानिवृत्त हातपंप यांत्रिकी चार महिन्यापासून पेन्शनच्या प्रतीक्षेत

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.