Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ट्रॅक्टर आणि बोलेरो गाडीच्या भीषण अपघातात 5 जण ठार, 3 जण जखमी

मिरजेच्या वड्डी येथील महामार्गावर घडला अपघात..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

सांगली दि.17 – सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी येथे भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहे. रत्नागिरी – नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला आहे. मृतांमध्ये 3 महिला,1 पुरुष आणि 12 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. बोलेरो गाडीतील मयत हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. हे सर्व जण एकाच गाडीतून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते.

मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी- नागपुर माहमार्गावरील वडडी गावाच्या हद्दीत बोलरे गाडी पोहचली असता ,रॉग साईडने विटाने भरलेला ट्रॅक्टर अचानक समोर आला,ज्यामध्ये भरधाव असणारी बलोरे गाडी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली, ज्यामध्ये गाडीचा चक्काचुर होऊन 5 जण जागीच ठार झाले आहेत, तर 3 जण गंभीर जखमी झाली आहे.जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.हे सर्व जण देवदर्शनासाठी कोल्हापूरहुन पंढरपूरला निघाले होते,एकाच कुटुंबातील हे सर्व जण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील सरवडे येथील रहिवाशी आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.