Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सी. आय .आय .आय. टी. प्रकल्पातून होणार कुशल मनुष्यबळाची निर्मिती

गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन यांच्यात सामंजस्य करार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 17 मे –  विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेत उच्च शिक्षण आणि स्वयंरोजगारांसाठी तरुणाईला विविध मार्ग उपलब्ध करून देण्याचे कार्य गोंडवाना विद्यापीठाकडून सुरू आहे. आदिवासींच्या परंपरागत संस्कृतीला, कलेला संशोधनात्मक व आधुनिक शिक्षणाची जोड देत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून विद्यापीठाने उपयुक्त अशा कौशल्यपूर्ण प्रशिक्षणावर भर दिलाय .आज घडीला सर्वच क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची नितांत गरज आहे. तथापि, उपलब्ध उद्योगांच्या तुलनेत कुशल मनुष्यबळाची संख्या खूपच कमी आहे. नेमकी हीच गरज ओळखून गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हाप्रशासन गडचिरोली यांच्यात सांमजस्य करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सी.आय.आय. आय.टी. हा प्रकल्प होऊ घातला आहे.

उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे. या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे विद्यार्थ्यांना इतर संस्थांच्या तुलनेत केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी प्रॅक्टिकलवर अधिक भर दिला जाईल . यासाठी लागणारी सर्व साधने व उपकरणे येथे उपलब्ध होतील. इलेक्ट्रिकल आणि संबंधित उद्योग क्षेत्रातील विविध विषय येथे शिकवले जातील. विद्यापीठाच्या जवळपास १ एकर परिसरात सर्व सुविधा पुरविल्या जातील. जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करून शिकता येईल. या केंद्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य अभ्यासक्रमाच्या संधी उपलब्ध होतील. गावातील विद्यार्थी येथे सहज शिक्षण घेऊ शकतील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काय आहे सीआयआयआयटी(CIIIT)

टाटा टेक्नॉलॉजीजचे ‘सीआयआयआयटी’ हे गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या प्रयत्नाने आणि कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या सहकार्याने प्रोत्साहन, नवकल्पना, आणि प्रशिक्षण(सेंटर फॉर इन्व्हेंशन,इनोव्हेशन,इंनकुबेशन अँड ट्रेनिंग )केंद्र आहे, जिथे जिल्ह्यातील व त्या जवळच्या समुदायांना त्यांचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी व्यापक धोरणाचा भाग म्हणून कौशल्य विकास नेटवर्कच्या अंमलबजावणीमध्ये प्रभावी, एकात्मिक आणि शाश्वत सेवा यांचे वितरण राहणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गोंडवाना विद्यापीठाचे योगदान

१७० कोटीचे टाटा टेक्नॉलॉजीचे स्किल डेव्हलपमेंट सेंटर विद्यापीठात सुरू होते आहे . विद्यापीठाने आपल्या जागेपैकी एक एकर जागा या सेंटर साठी दिलेली आहे .या प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. यातून निर्माण होणारे विद्यार्थी अतिशय कौशल्यपूर्ण आणि रोजगारक्षम असतील.जिल्हा प्रशासन व टाटा टेकनोलॉजी यांच्या सहकार्याने हा प्रोजेक्ट होऊ घातलाय. जिल्ह्यातील स्किल गॅप स्टडी आणि औद्योगिक आस्थापनांच्या गरजांनुसार आवश्यक ते जॉब रोल्स निश्चित करणे, सदर केंद्रातून प्रशिक्षित झालेल्यांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी विविध औद्योगिक आस्थापनांशी समन्वय साधणे व आवश्यकतेनुसार जॉब रोल्स अद्यावत करणे , गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील प्रशिक्षणार्थी कोणत्या महाविद्यालयातून, संस्थांमधून येणार आहेत याबाबत योग्य नियोजन करणे, सदर कोर्सेसेचे अभ्यासपुर्ण नियोजन करण्याकरता शैक्षणिक व औद्योगिक तज्ञांची भागीदारी घेणे, प्रत्येक कोर्सेस साठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व फी मॉडेल निश्चित करणे, टाटा टेक्नॉलॉजी कडून इतर ठिकाणी राबवण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती घेऊन त्यामधील अनुभवांचा सदर प्रकल्पाच्या नियोजनामध्ये वापर करणे. ही कार्ये जिल्हा प्रशासन आणि टाटा टेक्नॉंलॉजी लिमिटेड, गोंडवाना विद्यापीठ यांच्या समन्वयातून होतील.

सामंजस्य कराराची उद्दिष्टे

तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा, भारतातील कुशल मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करणे,अभियंते, ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि कुशल विद्यार्थी तयार करून रोजगारक्षम बनवणे, उत्पादन क्षेत्रातील उद्योगांना आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरविणे, रोजगारक्षमता वाढवणे आणि एमएसएमई आणि स्थानिक उद्योगांना याद्वारे पाठिंबा देणे,चांगल्या दर्जाच्या नोकरीच्या संधी वाढवण्यासाठी उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण देणे,आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमाला आधुनिक औद्योगिक पद्धतींमध्ये अपग्रेड करणे, नवोदितांना नवीन उत्पादने विकसित करण्यास मदत करणे,टेक्नॉलॉजी स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देणे, उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञानाची साधने आणि उपकरणांसह सी.आय.आय.आय.टी. ची स्थापना करणे.

हे पण वाचा :-

मुख्यमंत्र्यांनी घेतला जलयुक्त शिवार, कृषि सिंचन योजनांचा आढावा

पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Comments are closed.