Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोरगरिबांच्या हाकेला धावणाऱ्या स्व.बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ५ वा वर्धापन दिन..

१ डिसेंबर रोजी मुंबईत 'वैद्यकीय सेवा सन्मान' सोहळ्याचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 30नोव्हेंबर :- राज्यातील गोरगरीब-निर्धन रुग्णांच्या मदतीला धावून जाणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता ‘वैद्यकीय सेवा सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतल्या नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा सन्मान सोहळा पार पडणार आहे,असे कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार पक्षाचे अध्यक्ष, तथा माजी राज्यमंत्री,आमदार बच्चु भाऊ कडू हे असतील.

हा सन्मान सोहळा दोन सत्रांमध्ये होणार असून पहिल्या सत्रात, सकाळी १०.३०.वाजता गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी व्याख्यान होणार असून,त्यानंतर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे संपादित वैद्यकीय मदत मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील(माजी राज्यपाल, त्रिपुरा,बिहार,पश्चिम बंगाल),मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्य उदय सामंत, शंभूराजे देसाई, दादाजी भुसे, अब्दुल सत्तार,  संदीपान भुमरे, दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, अतुलजी सावे यांच्या हस्ते होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी प्रसन्न जोशी ( कार्यकारी संपादक,साम मराठी) आणि निलेश खरे(मुख्य संपादक,झी २४ तास),आमदार शहाजीबापू पाटील(ब्रँड ॲम्बेसेडर,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष)  मंदार पारकर(अध्यक्ष,मंत्रालय व विधिमंडळ पत्रकार संघ), विनोद जगदाळे ( अध्यक्ष,टी.व्ही.जर्नालिस्ट असोसिएशन),ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख नरेश म्हस्के आदी सन्माननीय मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी श्वेता हुल्ले आणि शेखर जोगळेकर हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. तर दुपारी १.०० ते २.०० वाजता स्नेहभोजन आयोजित केले आहे. तर दुसऱ्या क्षेत्रात हतकणंगलेचे खासदार धैर्यशील माने आणि गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री) यांचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विस्तार – वाढीसाठी रुग्णसेवकांचे कर्तव्य व जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन करतील.

आरोग्य परिसंवाद या कार्यक्रमात महेंद्र महाजन, तुकाराम मुंडे,डॉ.तात्यासाहेब लहाने,डॉ.एस.टी.टाकसाळे,डॉ.विजय सुरासे,डॉ.संजय ओक, संतोष आंधळे, संदीप आचार्य या मान्यवरांचा आरोग्यविषयक परिसंवाद होणार आहे. यावेळी विशाल बढे आणि रेश्मा साळुंखे हे सूत्रसंचालन करतील.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वैद्यकीय सेवा सन्मान सोहळा-पुरस्कार वितरण
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच मंत्रिमंडळातील सदस्य यांच्या हस्ते आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार होणार आहे. यावेळी सूत्रसंचालन मिलिंद भागवत हे करतील. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सन्माननीय खासदार,आमदार,पत्रकारिता क्षेत्रातील ख्यातनाम संपादक -पत्रकार आणि बाळासाहेबांची शिवसेनाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन विलास जोशी,अनिल भोर,डॉ.प्रदीप धवळ,डॉ.जे.बी.भोर,हेमंत कट्टेवार,अभिजित दरेकर, राज्य कक्ष प्रमुख रामहरी राऊत, राज्य सहकक्ष प्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे यांनी केलं आहे.

हे देखील वाचा :-

अनुसूचित जमातीची रिक्त पदे तात्काळ भरणार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.