Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

त्रिवेणी कम्पनीचा ट्रक मधून रेतीची अवैध वाहतूक, दोन ट्रक महसूल विभागाने केले जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 30नोव्हेंबर :- वाहतुक परवानाच्या अधिक रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकांना एटापल्ली येथील वन उपज तपासनी नाक्यावर महसूल विभागाच्या पथकाने तपासणी करून जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली असून जप्त करण्यात आलेले ट्रक त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीचे असल्याची माहिती आहे.

अहेरी तालुक्यातील महागाव येथील रेती घाटावरून टी .पी पेक्षा अधिक रेती घेऊन वाहतूक करणारे ट्रक क्र.Mh33T 3122, MH33 T 4199 हे एटापल्ली येथील वनऊपज नाक्यावर आले असताना महसूल विभागाच्या पथकाने ट्रक थांबवून तपासणी केली असता टीपी पेक्षा दोन्ही ट्रक मध्ये 9 ब्रास अधिक रेती आढळून आली. महसूल विभागाच्या पथकाने दोन्ही ट्रक जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले आहे. ही कारवाई करताना.डी. व्ही.रामटेके मंडळ अधिकारी , टी. ए. मुळे मंडळ अधिकारी ,संदीप जुनघरे तलाठी पंकज उसेंडी तलाठी .किरण वलके तलाठी व महसूल कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

गोरगरिबांच्या हाकेला धावणाऱ्या स्व.बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ५ वा वर्धापन दिन..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायतानिधी च्या कार्यालयास मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी अचानक भेट दिली.

Comments are closed.