Get real time updates directly on you device, subscribe now.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 12 एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील गाव खेड्यातील 87 रुग्णांनी मुक्तिपथच्या शिबिराचा लाभ घेऊन दारूचे व्यसन नको रे बाबा, असे बोलून दाखवले आहे. रूपीनगठ्ठा 15, चौडमपल्ली 22, विहीरगाव 2, आकापूर 10, कान्होली 19, खरपुंडी 13 येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार गाव पातळी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रूपीनगठ्ठा येथे सघन बैठकीच्या माध्यमातून एकदिवसीय शिबिराचे आयोजन केले असता एकूण 15 रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. रुग्णांची नोंदणी शुभम बारसे व शिबिराचे आयोजन भास्कर कड्यामी, राहुल महाकुलकार यांनी केले. यशस्वीतेसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक रामलाल दुगा, अंगणवाडी सेविका पवार व इतर लोकांनी सहकार्य केले. चामोर्शी तालुक्यातील कान्होली येथील शिबिरातून 19 रुग्णांनी पूर्णवेळ उपचार घेतला. शिबीराचे आयोजन सोनी सहारे व प्रियंका भुरले यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका तीलोतमा व इतर लोकांनी सहकार्य केले. गडचिरोली तालुक्यातील खरपुंडी येथे सघन बैठकीद्वारे एकदिवसीय व्यसन उपचार शिबिरात 15 रुग्णांनी नोंदणी केले व 13 रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला.
व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा
नियोजन व आयोजन स्वीटी आकरे यांनी केले. तिन्ही शिबिरांमध्ये समुपदेशन छत्रपती घवघवे व रुग्णांची केस हिस्ट्री प्रभाकर केळझळकर यांनी घेतली.अहेरी तालुक्यातील चौडमपल्ली गावामध्ये व्यसन उपचार शिबिर संपन्न झाले. यामध्ये एकूण 22 रुग्णांनी उपचार घेतला. शिबिरामध्ये पेशंटची नाव नोंदणी आनंदराव कुम्मारी यांनी केली तर केस हिस्ट्री दशरथ रमखाम व समुपदेशन व औषधोपचार पूजा येल्लुरकर यांनी केले. देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव येथे गाव पातळी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. यात 8 पेशंटनी नोंदणी केली व उपचार घेतला. पेशंटची नोंदणी अनुप नंदगीरवार यांनी केली. आरमोरी तालुक्यातील आकापूर येथे आयोजित शिबिराच्या माध्यमातून 10 रुग्णांनी उपचार घेतला. दोन्ही शिबिरांमध्ये समुपदेशन प्राजू गायकवाड, व केस हिस्ट्री शालिनी मेश्राम, नैना घुघुस्कार यांनी घेतली.
Comments are closed.