Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीच्या स्फोटात ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

वसईतील हृदय पिळवटून टाकणारी घटना

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई 3 ऑक्टोबर :- पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे बहुतांश लोकांनी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी स्कूटर पसंत केली, या स्कूटरच्या वापरामुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे हल्ली ग्राहकांचा ओढा हा बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटर खरेदीसाठी वाढला. असे असले तरी काल इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज होत असताना बॅटरीचा स्फोट होऊन एका ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात ही घटना घडली आहे.

या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयात हलवण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शब्बीर शाहनवाज असे या मृत मुलाचे नाव आहे. माणिकपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याआधी बुधवारी पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.वसई कॉस पॉवर इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. स्फोट झाला तेव्हा कारखान्यात ५० हून अधिक कर्मचारी काम करत होते. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली होती. १ ते २ किमीपर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला.आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.