Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर… पाकिस्तानला शिकवला धडा!

पहलगाम हल्ल्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे भारतीय हवाई सेनेची मोठी कारवाई; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा समर्थनार्थ पवित्रा..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

नागपूर :“भारतातील निष्पाप नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांना आता थेट त्यांच्या घरात घुसून उत्तर दिलं जातंय… हे नव्या भारताचं रूप आहे!” अशा शब्दांत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे जोरदार समर्थन करत केंद्र सरकारच्या कारवाईला पाठिंबा जाहीर केला.

पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता. यात अनेक निष्पाप भारतीयांनी आपले प्राण गमावले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई सेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यांवर क्षेपणास्त्र हल्ले करून मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामुळे हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना काहीसा न्याय मिळाला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवली भारतीय सेनेची ताकद

भारतीय सैन्याच्या या पराक्रमाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, भारत आता केवळ प्रतिकार करणार नाही, तर आघातच करेल! पाकिस्तानमधून आणि पीओकेतून चालणाऱ्या दहशतवादी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत, हाच संदेश या कारवाईने दिला आहे, असेही वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“दहशतवाद्यांना दया नाही – फक्त धडा!”

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, “भारतीय सैन्याच्या धैर्याला आमचा सलाम आहे. त्यांनी केलेली ही कारवाई फक्त सैनिकी नाही, तर ही एक राष्ट्रीय भावना आहे. देशावर आलेल्या प्रत्येक संकटाला भारतीय जवानांनी छातीवर घेतलं आहे आणि प्रत्येक वेळी शत्रूला धूळ चारली आहे.”

पाठिंबा केंद्र सरकारलाही…दहशतवाद्यांच्या विरोधातील या लढ्यात फक्त सैन्यच नव्हे, तर केंद्र सरकारने घेतलेली भूमिका देखील निर्णायक असून, ती देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे. या कारवाईला आमचा ठाम पाठिंबा असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.