Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बनावट नोटा दाखवून फसवणूक करणारी टोळी गजाआड

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 06 नोव्हेंबर :- जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा देवून फसवणूक करणारी सराईत टोळीला माटुंगा पोलीसांनी गजाआड केले आहे. देवराव भाउराव हिवराळे (35), रविकांत जर्नादन हिवराळे (36), योगेश वासुदेव हिवराळे (32) आणि योगेश वासुदेव हिवराळे (32) रा. बुलढाणा असे आरोपींचे नाव आहेत.

पुणे येथील फिर्यादी रामदास बल्लाळ यांना आरोपीनं इन्कमटॅक्स ऑफिसर असल्याचे सांगुन त्यांच्या कडे धाडीमध्ये जप्त केलेल्या नोटा बदलवून देतो असे सांगून 20 लाख रू. बदल्यामध्ये 40 लाख रू. देतो असे अश्वासन देउन त्यांना भारतीय बच्चो का बॅंक असे लिहिलेल्या बनावट नोटा देउन फसवणूक केल्याची तक्रार माटुंगा पोलीस ठाण्यात केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रकरणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपआयुक्त प्रणय अशोक, सहा. पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी आपल्या टीम सोबत शोध मोहिम चालवली. टीम ला मिळालेल्या माहितीच्या आधारे माटूंगा पोलीसांनी आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींनी अशाच प्रकारे अजून कोणा नागरिकांची फसवणुक केली आहे काय? याबाबत माटुंगा पोलीस अधिक चौकशी करत आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.