Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नेदरलॅंड ने केला दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

टी-20,  06 नोव्हेंबर :- रविवारी सकाळी विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणार्या दक्षिण आफ्रिकेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. नेदरलॅंडने दक्षिण आफ्रिकेला 13 धावांनी हरवून एक मोठा उलटफेर केला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे टी-20 विश्वचषक मधील आव्हान संपुष्टात आले आहे. यंदाच्या विश्वचषक मध्ये धक्कादायक निकालांची मालिका सुरूच आहे.

टी-20 विश्वचषक 2022 मधील 40 वा सामना आज दक्षिण आफ्रिका आणि नेदरलॅंड मध्ये खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नेदरलॅंड ने 20 षटकांत 4 बाद 158 धावा केल्या. मात्र, आफ्रिकन संघाला ही धावसंख्या पार करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत आठ विकेट्सवर केवळ 145 धावा केल्या. नेदरलॅंडकडून पराभव झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.