Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सलून व्यावसायिकाची झाली निर्घृण हत्या ..

विरार पोलीस ठाण्यात नागरिकांचा राडा !

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

विरार 6 ऑक्टोबर :- विरार येथील सहकार नगर येथील एका सलून व्यवसायिकाची लोखंडी रॉड डोक्यात घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या सलून व्यावसायिकाचे नाव आहे वेदनाथ शर्मा. बुधवारी रात्री देवीचे विसर्जन करून काही युवक परतत असतांना सहकार नगर येथील विठ्ठलवाडी चाळी जवळ दबा धरून बसलेल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या युवकांना मारहाण केली. त्यात फोन आणि पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. यातून हे युवक तिथून निसटले व त्यांनी त्याच्या विभागात राहणाऱ्या वेदनाथ शर्मा आणि इतर युवकांना ही गोष्ट सांगितली. त्या गुंडांना जाब विचारण्यास गेलेल्या वेदनाथ शर्मा आणि इतर युवकांना त्या जमावाने जोरदार मारहाण केली. त्यात लोखंडी रॉडचा घाव वेदनाथ च्या वर्मी लागला, त्याला हॉस्पिटलमध्ये मध्ये नेले असता त्याचे निधन झाले.असे वेदनाथ सोबत असणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

त्यानंतर पोलीसांना १०० वर फोन करून कळविण्यात आले. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. पोलिसांनी आरोपींना संरक्षण दिले असा स्थानिक रहिवाशांना संशय आला. त्यानी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. आणि विरार पोलिस स्टेशनला घेराव घालून राडा केला. हा जमाव आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवावा लागला. शेवटी पोलिसांनी ७ आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.