Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘ यम है हम’ वसई वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई, 06,ऑक्टोबर :- मीरा-भाईंदर -वसई-विरार पोलीस मुख्यालयाला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर वसई वाहतूक पोलिसांनी दिनांक ६ ऑक्टोबर रोजी नो-चलन डे साजरा केला. दुचाकी वाहन धारकांनी हेल्मेट घातले नसेल, किंवा ट्रिपल सीट घेतली असेल,तसेच चार चाकी वाहन चालकांनी सीटबेल्ट लावला नसेल, किंवा गाडीला काळ्या काचा लावल्या असतील. तर चलन न फाडता त्यांना प्रतिकात्मक यमराजाच्या हस्ते गुलाब पुष्प देण्यात आले. आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यास आपणास अपघात होऊ शकतो, आपला जीव गमावू शकतो. मग यमराजा सोबत आपल्याला थेट स्वर्गात जावे लागेल . त्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा. नियम तोडल्यास तुमची यमराजाशी गाठ नक्कीच आहे, हे लक्षात ठेवा, असे वाहतूक पोलीस वाहन धारकांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी प्रतिकात्मक यमराज आपल्या गधेने त्या वाहन चालकावर गधा ठेवत असे.

वसई मधील अंबाडी नाक्यावर हा उपक्रम राबविण्यात आला. वसईचा अंबाडी नाका आणि रेंज ऑफिस वसई येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी वाहनचालक कोणतेही वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी अंबाडी नाका वसई येथे नो चलन डे हा उपक्रम राबवला. या उपक्रमाला वाहनचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र खास आकर्षण ठरला तो प्रतिकात्मक यमराज !

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

7 हजार 649 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान 26 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार.

Comments are closed.