Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कल्याणच्या खडकपाडा भागात इमारतीला लागली अचानक आग

शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ठाणे 3 ऑक्टोबर :-  कल्याणच्या खडकपाडा भागात हायप्रोफाईल असलेल्या २३ मजली मोहन अल्टीजा या इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये अचानक आग लागली होती. आगीच्या भक्षस्थानी सापडून दोन फ्लॅटमधील संसाराची राखरांगोळी झाली असतानाच, येथील रहिवाशी कुटुंबीयांनी बाल्कनीतून साडीच्या आधारे खालच्या फ्लॅटच्या बाल्कनीत उतरत आपला जीव वाचविला. अंगाचा थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील वायलेनगर येथील २३ मजली मोहन अल्टिजा इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पांडे कुटूंब राहत असून त्याच्या घरात रविवारी सकाळी सहा वाजता शाॅर्ट सर्किट होऊन आग लागली होती. आगीत दोन फ्लॅटमधील साहित्य जळून खाक झाले. विशेष म्हणजे, सकाळीच धुके असल्याने इमारतीला धुक्याने वेढले आहे असे सुरुवातीला रहिवाशांना वाटले. धुके वेगाने आकाशाच्या दिशेने का जाते म्हणून सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा यांना संशय आला. त्यांनी आणि पत्नीने गच्चीत येऊन पाहिले तर त्यांना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे दिसले. तो आगीचा धूर वरच्या दिशेने येत आहे असे समजताच अध्यक्ष शहा, इमारती मधील रहिवासी विजय इंगळे यांनी तात्काळ अग्निशमन जवान, पोलिसांना ही माहिती दिली. घरात फर्निचर असल्याने आगीचा भडका उडाला होता.
सर्किटमुळेच आग लागल्याचे अध्यक्ष शहा यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आग लागलेल्या घरासमोरील चार रहिवाशांच्या घरांचे दरवाजे ज्वालांनी जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ तिसरा माळा गाठून पाण्याचा मारा करुन आग विझवली. आग लागताच सोसायटीचे उद्वाहन स्वयंचलित बंद झाले होते. या आगीची धग १८ व्या माळ्यापर्यंत लागत होती, असे अध्यक्ष शहा यांनी सांगितले.

हे पण वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.