Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गरबा खेळताना टवाळखोरांचा धिंगाणा

धारधार ब्लेडने केले वार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ठाणे 3 ऑक्टोबर :- तीन टवाळखोर तरुण दारू पिऊन सिगारेट ओढत गरबा खेळत होते. त्या टवाळखोर तरुणांना एका तरुणाने अश्या अवस्थेत गरबा खेळण्यास मनाई केल्याच्या रागातून त्या टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्यावर धारदार ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण नजीक आंबवली गावातील टिप्पना नगर मध्ये घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश कोंलची (वय २६), विवेक हरिचंद्र (वय २२) विजय शंकर (वय २२) असे गुन्हा दाखल झालेल्या टवाळखोर तरुणांची नावे आहेत. तर अयप्पा अर्जुन (वय २६) असे टवाळखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या घटनेनंतर गरब्याच्या ठिकाणी एकच गोधंळ उडून तरुणी व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तर गंभीर जखमी झालेल्या अयप्पाला काही मित्रांनी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला. या घटनेचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक ए. जे. बोराटे करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.