Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ट्रकने दिली ऑटोरिक्षा व दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

14 गंभीर जखमी, माजल पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली जखमींची भेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती, 08 नोव्हेंबर :- काल रात्री अमरावती जिल्ह्यातील तिवसा ते कुऱ्हा मार्गावर झालेल्या ट्रक, ऑटोरिक्षा व दुचाकीच्या विचित्र अपघातात दोघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. जखमींवर अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच माजी पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर आणि तिवसा उपविभागीय अधिकारी डा. नितीन व्यवहारे यांनी अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयात जाउन परिस्थितीचा आढावा घेत जखमींची भेट घेतली.

माहितीनुसार तिवस्यावरून कुऱ्हा मार्गे जाणारा भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने प्रवासी घेऊन येणाऱ्या ऑटोरिक्षा व दुचाकीला जबर धडक दिल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात घटनास्थळी दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एकाचा अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर यामध्ये एकूण 14 जण जखमी असून 7 जण गंभीरित्या जखमी झाले आहेत.  अपघातातील जखमीना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आहे. माहिती मिळताच तिवसा पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील कारवाई तिवसा पोलीस करित आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.