Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शॉटगन राष्ट्रीय स्पर्धेत ‘कांस्य पदक’ पटकावणाऱ्या अभिषेक पाटीलचा पालघर जिल्हापरिषदेमार्फत सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर प्रतिनिधि 19 ऑगस्ट :-  नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे दिल्ली येथे २५ ते ३१. जुलै २०२२ रोजी पार पडलेल्या पहिल्या दिग्विजय सिंह मेमोरियल शूटिंग चॅम्पियनशिप शॉटगन राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावून अभिषेक पाटील यांने पालघर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. त्यामूळे नेमबाज अभिषेक पाटील याचा जिल्हा परिषदेमार्फत परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्या हस्ते सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समीती सभापती ज्ञानेश्वर सांबरे, सर्व समिती सभापती यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थितीत होते. यावेळी जि. प. सदस्या नीता पाटील यांचेही यावेळी सर्व सभागृहामार्फत अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक तुषार माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) संघरत्ना खिल्लारे तसेच सर्व विभाग उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पहिल्या दिग्विजय सिंह मेमोरियल शूटिंग चॅम्पियनशिप शॉटगन राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ‘ट्रॅप शुटिंग’ या प्रकारात ‘कांस्य पदक’ पटकावणारा नेमबाज अभिषेक हा पालघर तालुक्यातील गोवडे गावातील जिल्हा परिषद सदस्या नीता पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते समीर पाटील यांचा सुपुत्र आहे. अभिषेकने मिळवलेल्या यशवाद्दल जिल्ह्यात सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दहीहंडीला खेळाचा दर्जा, आता वर्षाचे 365 दिवस खेळा दहीहंडी..!

 

Comments are closed.