Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विद्यापीठ परिसर व महाविद्यालय तात्काळ सुरू करण्याबाबत अभाविप आक्रमक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

कोल्हापूर, दि. २ फेब्रुवारी: मागील ११ महिन्यांपासून विद्यापीठ परिसर आणि महाविद्यालय बंद असल्यानं शिक्षणमंत्री उदय सामंत आणि विद्यापीठ प्रशासनाचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अभाविपद्वारे आज कोल्हापुरात निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी विद्यापीठ परिसर आणि महाविद्यालय तात्काळ सुरू करण्यात यावे आणि ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या कार्यक्रमात कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यासाठी अभाविपद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी कोल्हापूर महानगर मंत्री ऋषिकेश माळी म्हणाले, “एकीकडे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याच्या कारणास्तव महाविद्यालय व विद्यापीठ परिसर बंद ठेवण्यात येतात, तर दुसरीकडे मद्यालये, मंदिरे, चित्रपटगृह हे सुरू आहेत. तसेच ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचा कोविड प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा उडवण्यात येतो.अशा प्रकारच्या घटना प्रशासनासमोर विद्यार्थ्यांना आणून द्याव्या लागतात ही शोकांतिका असल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगर मंत्री ऋषिकेश माळी यांनी सांगितलं.

“उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @कोल्हापूर” या कार्यक्रमात कोविड नियमांचे सर्रास उल्लंघन केलं जातं, परंतु विद्यापीठ परिसर आणि महाविद्यालय सुरू करण्यासाठी मात्र सोयीस्कर बंधनं घालण्यात येतात. या घटनेचा निषेध व्यक्त करताना कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय आपत्ती कायदा, महाराष्ट्र कोविड उपाययोजना कायदा व साथीचे रोग प्रतिबंध कायद्याद्वारे उपस्थित शिक्षणमंत्री उदय सामंत, आयोजक शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डी. टी. शिर्के, प्र.कुलगुरू पी. एस. पाटील, कुलसचिव विलास नांदवडेकर यासर्वांवर तात्काळ गुन्हा नोंद करण्या विषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे आग्रही मागणी आज विद्यार्थी परिषदेनं केली. – ऋषिकेश माळी महानगर मंत्री अभाविप

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.