Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दीर्घ प्रतिक्षेनंतर गडचिरोली आणि चंद्रपुरात पहिला पाऊस बरसला.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली/ चंद्रपुर, 23 जून – गेले दीड महिना जिल्हावासीयांनी उन्हाची काहीली अनुभवली होती. मॉन्सून साधारण 7 जून रोजी जिल्ह्यात दाखल होत असताना 14 दिवस लोटून गेल्यानंतरही मृगधारा न बरसल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र आज दुपारी चंद्रपुरात आणि गडचिरोली जिल्ह्यातअचानक काळे ढग दाटून येत मुसळधार पाऊस बरसला.  या बरसत्या पावसामुळे जिल्ह्यातील उन्हाची काहिली काहीशी कमी झाली. आगामी काळात असाच पाऊस बरसून बळीराजाची चिंता दूर होईल अशी भावना व्यक्त होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यातील काही ठिकाणी वज्रघातसह हलक्या स्वरूपाचे पाऊसाची शक्यता आहे.नागरिकांनी कृपया उचित काळजी घ्यावी. आकाशात विजेचा कडकडाट/गडगडाट असतांना धातुजन्य वस्तू जवळ बाळगू नका. धातुजन्य खांब, वीज सुवाहक वस्तू जवळ राहू नका. विशेषतः उंच झाडापासून दूर रहावे. उंच ठिकाणी असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी यावे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.