Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपुरात कार्यरत नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे (पाचभाई) याना 2023 चा राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगल पुरस्कार राष्ट्रपती हस्ते प्रदान.

दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु याच्या हस्ते मिळाला सन्मान, चंद्रपूर-गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात अवरित रुग्णसेवा.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 23 जून – चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे (पाचभाई) यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुष्पा पोडे या 2001 पासून नर्सिंग क्षेत्रात विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत. पोडे यांनी 2001 मध्ये ग्रामीण रुग्णालय अहेरी इथून आपल्या कार्याची सेवा सुरू केली. गडचिरोली जिल्ह्यासारख्या नक्षलग्रस्त भागात त्यांनी अवरित पाच वर्षे रुग्णांची सेवा केली.

चंद्रपूर जिल्हा ग्रामीण भागात बदली झाल्यानंतर बावीस वर्ष त्यांची रुग्णसेवा सुरू आहे. कोरोना सारख्या आपत्ती काळात त्यांनी आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करून कोरोनाशी लढण्यासाठी तयार केले. आणि स्वतःही कोरोना सारख्या आपत्ती काळात रुग्णसेवेत अविरत झोकून देऊन अनेकांचे प्राण वाचवले. आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे पुष्पा पोडे यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल अवॉर्ड वितरित करण्यात आला.  पुष्पा पोडे या शेतकरी कुटुंबातील असून त्या चंद्रपूर जिल्यातील कळमना या गावातील आहे. त्यांनी हा पुरस्कार महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.