Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनेक चढउतारांनंतर पंकजा मुंडेंना मिळाले मंत्रिपद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई : पंकजा मुंडे या  भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असून जोरदार वक्तृत्व, आक्रमक स्वभाव, अशी ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांना गेल्या काही वर्षांत राजकारणामध्ये बरेच चढउतार बघावे लागले असून पुन्हा कॅबिनेट मंत्री होत त्यांनी जोरदार कमबॅक केले आहे.

२०१४ मध्ये परळीतून जिंकल्यानंतर त्या राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री झाल्या. २०१९ मध्ये परळीतून त्यांचे चुलत बंधू व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतर त्यांचे राजकीय भवितव्य संकटात आले. मात्र,  यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे बंधू धनंजय सोबत असूनही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जोरदार किल्ला लढवूनही त्या पराभूत झाल्यात. परंतु पराभूत होऊनही पक्षाने  जुलै २०२४ मध्ये त्यांना पक्षाचे विधान परिषदेची आमदारकी दिली व आज मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काहीच दिवसांत त्यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मध्य प्रदेश भाजपच्या त्या सहप्रभारी झाल्या. त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार, त्यांना राज्यसभेवर पाठविणार किंवा विधान परिषदेवर पाठविणार, अशा बातम्या माध्यमांमधून येत राहिल्या. मात्र, तसे काहीही झाले नाही. काही विधानांमुळे त्या चर्चेत मात्र येत राहिल्या. राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे खरेतर ‘गोपीनाथ मुंडे स्कूल ऑफ पॉलिटिक्स’शी संबंधित राहिले. मात्र, पंकजा आणि त्यांचे संबंध म्हणावे तसे निकटचे राहिले नाहीत. दोघांमधील दुराव्याच्या बातम्याही झाल्या. मात्र, त्यांना पुन्हा विधान परिषद मिळत असताना कटुता दूर झाली, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यात महत्त्वाची भूमिका होती.

हे पण पहा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.