Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आग लागल्यावर जाधव मार्केटवर मनपाची धडक कारवाई

आता आली नालासोपारा मनपाला जाग

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नालासोपारा 31 ऑक्टोबर :- नालासोपारा पूर्वेला स्टेशन जवळ असलेल्या जाधव मार्केट मध्ये शनिवारी रात्री आठ-साडे आठ च्या दरम्यान भीषण आग लागली. त्यात मार्केट मध्ये असणारे गाळे जळून खाक झाले. यापूर्वी देखील या जाधव मार्केट मध्ये आग लागली होती, परंतु वीज वितरण कंपनी, अग्निशमन दल, मनपा प्रशासन यांनी दुर्लक्ष केले होते. जाधव मार्केट हे अनधिकृत आहे अशा तक्रारी देखील प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. शनिवारी रात्री पुन्हा आग लागल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले.

शनिवारी लागलेली आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागली असे म्हटले जाते. तर काहींच्या मते मार्केट मध्ये असणाऱ्या फटाक्यांच्या दुकानामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आज दुपारी मात्र वसई- विरार मनपा ऍक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. मनपा अधिकाऱ्यांनी जाधव मार्केट मध्ये असणाऱ्या दुकानदारांना आपले सामान स्वतः काढण्याची विनंती केली. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी मार्केट मध्ये असणाऱ्या अनधिकृत दुकानांवर जेसीबी च्या सहाय्याने कारवाई केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.