Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अडीच लाख रोजगाराचे सामंजस्य करार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २३ डिसेंबर : उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत २५ भारतीय कंपन्यांसोबत ६१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, उद्योग प्रतिनिधी म्हणून जिंदाल ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदाल तसेच विविध कंपन्याचे प्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उद्योग विभागाने केलेल्या सामंजस्य करारामध्ये एक्साईड इन्डस्ट्रीज, भारत बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग, (५०० कोटी गुंतवणूक १००० रोजगार निर्मिती), श्रीधर कॉटसाइन, वस्त्रोद्योग (३६९ कोटी गुंतवणूक, ५२० रोजगार निर्मिती), ज्युबिलन्ट फूड वर्क्स, अन्नप्रक्रिया (१५० कोटी गुंतवणूक, ४०० रोजगार निर्मिती), जेएसडब्ल्यू स्टील (२० हजार कोटी गुंतवणूक, ३००० रोजगार निर्मिती), गोयल गंगा आयटी पार्क (१००० कोटी गुंतवणूक, १० हजार रोजगार निर्मिती), जी जी मेट्रोपॉलिस, आयटी पार्क (१५०० कोटी गुंतवणूक १५ हजार रोजगार निर्मिती), सेंच्युर फार्मास्युटिकल लिमिटेड, फार्मास्युटिकल (३०० कोटी गुंतवणूक, १५०० रोजगार निमिर्ती), ग्रँव्हिस भारत, अन्नप्रक्रिया (७५ कोटींची गुंतवणूक, १०० रोजगार निर्मिती), के. रहेजा, माहिती तंत्रज्ञान (७ हजार ५०० कोटी गुंतवणूक, ७० हजार रोजगार निर्मिती), इंडियन कॉर्पोरेशन लॉजिस्टीक, लॉजिस्टीक (११०४९.५ कोटी गुंतवूणक ७५ हजार रोजगार निर्मिती), बजाज ऑटो अँड ऑटो कंपोनंट, (६५० कोटी गुंतवूणक २५०० रोजगार निर्मिती), सुमेरू पॉलिस्टर एलएलपी, वस्त्रोद्योग (४२५ कोटी गुंतवूणक, ५०० रोजगार निर्मिती), नवापूर इंडस्ट्रीयल पार्क एलएलपी, इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर (२०० कोटी गुंतवणूक, १०० रोजगार निर्मिती), कीर्तीकुमार स्टील उद्योग, स्टील उत्पादन (७ हजार ५०० कोटी गुंतवणक, ६० हजार रोजगार निर्मिती), इन्स्पायर इन्फ्रा (औरंगाबाद) लि. इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल एरिया (७ हजार ५०० कोटी गुंतवणूक, १० रोजगार निर्मिती), जेनक्रेस्ट बायो प्रॉडक्ट, वस्त्रोद्योग (५०० कोटी गुंतवणूक, ५०० रोजगार निर्मिती), मलक स्पेशालिटीज, केमिकल (४५.५६ कोटी गुंतवणूक ६० रोजगार निर्मिती), अम्बर एन्टरप्रायझेस इंडिया लि.मॅन्युफॅक्चरिंग (१०० कोटी गुंतवणूक, २२० रोजगार निर्मिती), ग्रॅंड हॅण्डलूम फर्निचर प्रा. लि.वस्त्रोद्योग (१०६ कोटी गुंतवणूक, २१० रोजगार निर्मिती), अॅम्पस फार्मटेक्स इंडस्ट्रीज, इंजिनिअरींग (१०४ कोटी गुंतवणूक, २२० रोजगार निर्मिती), क्लिन सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी प्रा.लि., केमिकल (१३२.४ कोटी गुंतवणूक, ७५० रोजगार निर्मिती), सोनाई इडेबल इंडिया प्रा. लि. अन्न, खाद्य तेल रिफायनरी (१८९.५७ कोटी गुंतवणूक, ३०० रोजगार निर्मिती), सुनील प्लास्टिक इंडस्ट्रीज, डेव्हलपर (११० कोटी गुंतवणूक, ५०० रोजगार निर्मिती), रिन्युसिस इंडिया प्रा लि, तरिन्युएबल एनर्जी (५०० कोटी गुंतवणूक, १५०० रोजगार निर्मिती), हरमन फिनोकेम, केमिकल (५३६.५ कोटी गुंतवणूक, १५०० रोजगार निर्मिती), अशी रु. ६१०४३ कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. या माध्यमातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

Comments are closed.