Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठीत!

अध्यक्षपदी प्रकाश दुर्गे तर सचिव पदी सुरेंद्र अलोणे यांची निवड

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

अहेरी, दि. १३ डिसेंबर :  येथील अहेरी पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारिणी काल (रविवार दि.11) गठीत करण्यात आली. यात सर्वानुमते अध्यक्ष पदी प्रकाश दुर्गे, सचिव पदी सुरेंद्र अलोणे, उपाध्यक्ष पदी प्रशांत नामनवार तर कोषाध्यक्ष पदी अशोक पागे यांची निवड करण्यात आली. अहेरी येथील शासकीय विश्राम गृहात कार्यकारिणीची बैठक जेष्ट सदस्य गिरीष मद्देर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

कार्यकारणीत सदस्यांमध्ये विवेक बेझलवार, प्रतिक मुधोळकर, अमित बेझलवार, दीपक सुनतकर, गिरीष मद्देर्लावार, सुधाकर उमरगुंडावार, ऋषि सुखदेवे, विजय सुनतकर, संतोष मद्दीवार, संजय धुर्वे आदिंचा समावेश आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन कार्यकारिणी गठीत झाल्यानंतर, बैठकीत येत्या ६ जानेवारी पत्रकार दिन साजरा करणे, समाजोपयोगी उपक्रम राबवून संघटना मजबूत करणे या व अन्य विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच याचवेळी नवनियुक्त पदाधिकारी यांचे संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.