Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी नगर पंचायतीचा उत्कृष्ट पत्रकार सोहळा उत्साहात साजरा

ऋषी सुखदेवे, विजय सुनतकर, दीपक सूनतकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराचे मानकरी..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. १८ ऑगस्टकोरोनाच्या कार्यकाळात वस्तुनिष्ठ वृत्त आणि जनतेच्या व्यथा मांडण्याचे काम केलेल्या आणि आताच्या पूरपरिस्थितीचे सखोल वार्तांकन करून प्रतिकूल परिस्थितीत लोकांपर्यंत पोहोचवून सामाजिक दर्शन घडविणारे अहेरी पत्रकार संघटनेतून आपल्या पत्रकारितेतील बातम्यातून सर्वाधिक निर्भीड व निष्पक्ष बातम्या करून समाजजीवनाचे वास्तव दर्शन घडविणारे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे, कोषाध्यक्ष विजय सूनतकर, दीपक सूनतकर यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून अहेरी नगर पंचायती तर्फे सन्मान करण्यात आला.

पुरस्कार वितरण नगर पंचायतीचे अध्यक्ष राजा करपेत, उपाध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन, मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण वानखेडे यांच्या हस्ते झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी समाजातील विविध मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. या पुरस्काराने पत्रकारांवर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मृत्यूचा तांडव करणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.