Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला सर्व संघटनांनी पाठिंबा द्यावा – अनिल जवादे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २४ मार्च:संयुक्त किसान मोर्चा’ या बॅनरखाली देशाती ल ५०० पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन दिल्लीच्या सीमेवर शांततामय मार्गाने केंद्र सरकारने केलेले जुलमी कृषी कायदे रद्द करण्याबाबत आंदोलन करित आहेत. आतापर्यंतच्या या आंदोलनात जवळपास ३०० हून अधिक शेतकरी हुतात्मे झालेले आहेत. या सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या विरोधातच कायदे केलेले आहे असे नाही तर देशातील पंचाहत्तर टक्के जनतेच्या आयुष्यावर दुष्परिणाम होतील असे विद्यार्थी, कामगार, बेरोजगार, छोटे व्यापारी, मजदूर यांच्या दैनंदिन आयुष्यवर कुठाराघात करणारे कायदे संसदेत मंजूर करून घेतलेले आहे. आता नव्याने संसदेत पारित केलेले भारतीय जीवन विमा ( LIC ) मुळे देशातील विमाधारक या निर्णयाने प्रभावित होणार आहे. संसदेतील पाशवी बहुमताच्या जोरावर हे सरकार जनहित विरोधी कायदे करीत आहे याचा विरोध म्हणून देशातील विध्यार्थी, कामगार, मजदूर, कर्मचारी अश्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन या सरकारचा विरोध करावा व 26 मार्च च्या भारत बंद मध्ये सहभागी व्हावे असे आव्हान शेतकरी आंदोलक अनिल जवादे यांनी केलेले आहे.

केंद्रातील भाजप सरकारने सार्वजनिक संपत्तीची विक्री करणारे जनविरोधी निर्णय घेतलेले आहेत. इंधन व गॅस सिलेंडरच्या झालेल्या प्रचंड दरवाढीने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले आहेत. या सर्व बाबींना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने दि. २६ मार्च २०२१ रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. २६ मार्च २०२१ रोजीच्या भारत बंदला विदर्भ विकास आघाडी ने पाठिंबा दिलेला असून आपण गाव व तालुका पातळीवर निर्धाराने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी आंदोलक अनिल जवादे यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.