Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वीजरोधक पोल यंत्र उभारणीसाठी 33 कोटी रुपये मंजूर

गडचिरोली जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतीसाठी 11 कोटी 56 लक्ष मंजूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २४ मार्च: चंद्रपूर आणि गडचिरोली  जिल्हयात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात  विज पडून निष्पाप लोकांचा बळी जातो. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून मदत व पुनर्वसन विभागाकडून  चंद्रपूर जिल्हयातील ८२७ ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधकपोल यंत्र लावण्यात येणार असून त्यावर २० कोटी ९२ लक्ष रूपये तसेच गडचिरोली जिल्हयातील ४७५ ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधकपोल यंत्र लावण्यात येणार असून त्यावर ११ कोटी ५६ लक्ष रुपये मंजूर करण्यात  आले आहे. या कामाचा शु्भारंभ ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी येथे २२ मार्चला ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधक पोल यंत्र उभारून या कामाचा शुभारंभ केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाट होऊन वीज पडून अनेक निरपराध लोकांचा बळी जात  आहे तर काही लोक गंभीर जखमी  होत आहे.  त्यामुळे त्यांचे कुटुंब, त्यांचे संसार उध्वस्त होऊन आर्थिक व माणसिक त्रास त्यांच्या वारसांना सहन करावा लागत आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या  निधीतून वीज प्रतिबंध यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रथमच: चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयाची निवड करून त्यात चंद्रपूर जिल्हयातील ८२७ ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधक पोल यंत्र बसविण्यात येणार असून त्यासाठी २० कोटी ९२ लक्ष रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधकपोल यंत्र बसविण्यासाठी ११ कोटी ५६ लक्ष रुपये याप्रमाणे दोन्ही जिल्ह्यातील १ हजार ३०२  ग्रामपंचायतीसाठी ३२ कोटी ४८ लक्ष रुपयांचा निधी मदत व पुनर्वसन विभागाकडून मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हे काम युध्द पातळी सुरू करण्यात येणार असून या कामाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे २२ मार्चला वीज रोधकपोल यंत्र उभारून शुभारंभ करण्यात आलेला आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.