Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्ली येथे स्वच्छ भारत अभियान फलकासमोरच स्वच्छतेचा उडाला फज्जा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या श्रीराम चौक नजीक असलेल्या जिल्हा परिषद मुलांची शाळेच्या वॉल वर हागणदारी मुक्ती व स्वच्छ भारत अभियानासंदर्भात घोषवाक्य लिहिले आहेत. या वॉलभिंती च्या नजिक या घोषणेचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र दिसते आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


या भिंती नजीक घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी कचरा कुंडी नसल्याने कचरा हा उघड्यावरच टाकला जातो आहे.त्यापासून आजूबाजूच्या परिसरात दुर्गधी पसरत आहे. या ठिकाणी वन वसाहती मध्ये राहणाऱ्या व आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना आरोग्याची समस्या उदभवत आहे.नजीकच मोठ्या प्रमाणात शेण,कचरा पडून असल्यानें स्वच्छ भारत अभियानाला ग्रामपंचायत आलापल्ली कडून हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.