Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

व्यसन उपचारासाठी आंबेटोला वासीयांचा पुढाकार

गाव संघटनेच्या परिश्रमातून 16 वर्षांपासून दारुबंदी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 4 ऑगस्ट 2023 ; गडचिरोली तालुक्यातील आंबेटोला हे गाव मागील 16 वर्षांपासून दारूविक्री मुक्त आहे. या गावात गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तीपथच्या मार्फतीने दोन दिवशीय व्यसन उपचार शिबीर घेण्यात आले असता 30 रुग्णांनी उपचार घेतला व  दारुचे व्यसन सोडण्याचा निर्णय केला आहे.

आंबेटोला हे गाव ग्रामस्थांच्या पुढाकाराने मागील 16 वर्षांपासून अवैध दारूविक्रीमुक्त गाव म्हणून ओळखले जाते. ही दारुबंदी टिकवून ठेवण्यासाठी मुक्तीपथ गाव संघटनेतर्फे अथक परिश्रम घेतले जात आहेत. त्यामुळे या परिसरातील मद्यपी दारू पिण्यासाठी मुरूमबोडी, बोथेडा या गावांकडे धाव घेतात. सध्या गावातील रुग्णांची गरज लक्षात घेता गाव संघटनेने दोन दिवसीय व्यसन उपचार शिबिराची मागणी केली. त्यानुसार मुक्तीपथ तर्फे आयोजित शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण गावातील 30 जणांनी व्यसन उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्णय घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी संयोजक प्रभाकर केळझरकर यांनी रूग्णांची केस हिष्ट्री घेत धोक्याचे घटक सांगितले. समुपदेशक छत्रपती घवघवे यांनी दारूची सवय कशी लागते, शरीरावर होणारे दुष्परिणाम, नियमित औषधोपचार आदींची माहीती दिली. शिबिराचे नियोजन मुक्तीपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवणनाथ मेश्राम यांनी केले तर यशस्वीतेसाठी उपसरपंच दीपक भोयर, डंबाजी साखरे यांच्यासह गाव संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-
https://youtu.be/0W5cwagvLOw
https://youtu.be/eYC4zWxQe7w

Comments are closed.