Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खासदार अशोक नेते सहकुटुंब नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या भेट घेतली.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

नवी दिल्लीत, 4 ऑगस्ट 2023 ; खासदार अशोक नेते यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहपरिवार भेट घेतली. या कौटुंबिक भेटीत त्यांच्यासोबत पत्नी अर्चना, मुली अक्षिता आणि अशिता तथा मुलगा अर्णव उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधानांनी कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख करून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुलींना शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करत त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुलींनी सक्षम होऊन भविष्यातील जबाबदाऱ्या स्वीकारत देशासाठी योगदान द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशातच नाही तर जगात लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या आपल्या पंतप्रधानांना भेटून खूप आनंद झाल्याची भावना यावेळी अक्षिता आणि अशिता नेते यांनी व्यक्त केली. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात मार्गी लागलेली कामे आणि प्रलंबित कामांबद्दल खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा ही केली.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.