Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वीज कर्मचाऱ्याला भल्या मोठ्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावातील भयानक घटना सरकारी कामात हस्तक्षेप....

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

(जळगांव ) एरंडोल  30 ऑगस्ट :-  (जळगांव ) – एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीज चोरी करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मोठ्या दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

महावितरण विभागाचे कर्मचारी अक्षय महाजन हे अधिकाऱ्यांसह वीज चोरी करणारे आकडे काढण्यासाठी मंगळवारी एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात गेले होते. या दरम्यान गावात मनोज पाटील यांचे आकडे काढल्यावर तो वीज कर्मचारी अक्षय महाजन यांच्या मागे मोठा दांडका घेवून मागे सुटला. तसेच हातातील भल्या मोठ्या दांडक्याने वीज कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मागणीत वीज कर्मचारी अक्षय महाजन यांना मोठी गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी जखमी वीज कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत असून मारहाण करणाऱ्यावर कारवाई कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वीज कर्मचाऱ्यामधून होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

https://loksparsh.com/top-news/gadchiroli-police-jawan-opened-fire-on-his-colleague/29342/

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.