Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टिपेश्वर अभयारण्यातील जखमी अस्वल परत नैसर्गिक अधिवासात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वर्धा 30 ऑगस्ट :-  दिनांक 5 ऑगस्ट 2022 ला पांढरकवडा वन विभागाला टिपेश्वर अभयारण्या लागत असलेल्या पारवा वनपरिक्षेत्रात एक 13 ते 14 वर्षाचे नर अस्वल जखमी अवस्थेत आढळले. डोक्यावर झालेल्या जखमांमुळे ते सारखे विव्हळत होते. आक्रमक झाले होते. त्याला जेरबंद करण्यासाठी मदतीसाठी वर्धा येथील करुणाश्रमच्या पीपल फॉर ॲनिमल च्या बचाव पथकाला बोलविण्यात आले.
तात्काळ बचाव पथक तेथे पोहोचले. शर्थीच्या प्रयत्नानंतर जखमी अस्वलाला जेरबंद करण्यात यश आले. बचाव पथका द्वारे अस्वलावर तात्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वर्धा येथील करुणाश्रम येथे हलविण्यात आले होते.

तब्बल 20 दिवस करुणाश्रम येथे या जखमी नर अस्वलावर उपचार करण्यात आले. वैद्यकीय अधिकऱ्याच्या सूचनेनुसार विविध चाचण्या करण्यात आल्या. उपचाराला अस्वल प्रतिसाद देऊ लागले.जखमा पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परवानगीने व वनविभागाच्या सहकार्याने परत त्याला टिपेश्वर अभयारण्यात सोडण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

..पुन्हा एका इसमाचा वाघाने घेतला बळी.. बळी ची संख्या पोचली ११ वर..

 

Comments are closed.