Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

..पुन्हा एका इसमाचा वाघाने घेतला बळी.. बळी ची संख्या पोचली ११ वर..

वनविभागा च्या शून्य नियोजनाने शेतकरी वार्‍यावर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आरमोरी 29, ऑगस्ट :- सालमारा येथील शेतकरी कक्ष क्रमांक ४७ मधून सायकलने जात असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक इसमावर झडप घालून काही अंतरावर फरफडत नेऊन जागीच ठार केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली असून बळीराम कोलते ( ४७) असे मृतकाचे नाव असून सालमारा येथील रहिवाशी आहेत.

वडसा वनविभागात येणाऱ्या आरमोरी वनपरिक्षेत्रातील आरमोरी, अरसोडासह अन्य ठिकाणी वाघाने आतापर्यंत १० नागरिकांचा बळी घेतल्यानंतर मानवी रक्ताची चटक लागलेल्या नरभक्षक वाघाने पुन्हा आज एकाचा बळी घेतल्याने एकूण बळीची संख्या ११ वर पोहोचली असल्याने स्थानिक नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने वनविभागा विरोधात आक्रोश व्यक्त केल्या जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जोगीसाखरा गट ग्रामपंचायतीत असलेल्या सालमारा येथील अत्पभुधारक शेतकरी सालमारा येथुन शंकरनगर जंगलातील कक्ष क्रमांक ४७ मध्ये असलेल्या रस्त्या वरून सायकलीने जात असताना रस्त्यात नाला आल्याने पुलाअभावी पाण्यातून जात असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक ईसमावर झडप घालून काही अंतरावर फरकडत नेऊन जागीच ठार केले .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर घटनेची माहिती प्राप्त होताच  घटनास्थळी सरपंच संदिप ठाकुर, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम ,अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियनचे अमोल मारकवार, यांनी घटनास्थळ गाठून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले.मात्र घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी वेळेवर उपस्थित झाले नसल्याने घटनास्थळीच ठिय्या आंदोलन करण्यात आले.

जो पर्यंत वनअधिकारी घटनास्थळी येणार नाही आणि संपूर्ण मागण्या मंजूर करणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नसल्याचे संकेत देताच काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आरमोरी वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश आत्राम यांनी पोलिसांना घटनेची माहिती देऊन पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण केले मात्र मृतक परिवारासह स्थानिक नागरिकही ठाम भूमिकेवर असल्याने वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या परिवारांना योग्य मोबदला देण्यासाठी स्थानिकाच्या वतीने विविध मागण्यां करण्यात आल्या.

यामध्ये मृतकाच्या परिवारांना अत्यविधीसाठी ५० हजार रुपये द्या. सानुग्रह अनुदानात वाढ करुण शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला देण्यात यावा ,शेतिवर जाण्यासाठी संरक्षण द्या, वाघाचा बंदोबस्त करून भयमुक्त करण्याच्या मागण्या रेटून धरल्याने काही वेळ वन अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली.

मात्र घटनेचं गांभीर्य ओळखून वन विभागाचे सहायक वनाधिकारी मनोज चव्हान यांनी मागण्या मान्य केल्याने वातावरण शांत होताच घटनास्थळावरून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अधिक तपास सहायक वनाधिकारी मनोज चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम पोलिस निरीक्षक मनोज काळबाधे, उपक्षेत्र सहायक गाजी शेख ,उपक्षेत्र सहायक राजु कुंभारे, वनरक्षक करकाडे, गेडाम करीत आहेत.

शंकरनगर, जोगीसाखरा, सालमारा परीसरातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेतजमीन त्याने शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतात जावे लागते मात्र वाघाचे वाढते आक्रमण शेतकऱ्यांसाठी चिंतेसह दहशत निर्माण झाल्याने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा वनपरीक्षेत्र कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जोगीसाखरा गट ग्रामपंचायतीचे सरपंच संदिप ठाकुर रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात परीसरातील जनतेनी दिला आहे.

हे देखील वाचा :-

वर्ध्यात फोडले एटीएम, 22 लाखाची रोकड लंपास

धावत्या 108 रुग्णवाहिकेचं चाक निखळले…BVG चा भोंगळ कारभार रुग्णांच्या जीवावर बेततोय..

Comments are closed.